गाेरखपूर, बनारससाठी भुसावळ विभागातून धावणार ‘या’ विशेष गाड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ नोव्हेंबर २०२१ । दिवाळीमुळे रेल्वे गाड्या खच्चून गर्दीने वाहत आहेत. कन्फर्म आरक्षण, तत्काळ रेल्वे तिकीट मिळत नसल्याने होणारी गैरसोय पाहता रेल्वे प्रशासन मुंबई येथून गाेरखपूर, दानापूर व बनारस येथे जाण्यासाठी विशेष गाड्या साेडणार आहे. या गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्याने प्रवाशांची साेय हाेईल. मात्र, त्यातून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांना प्रवास करता येईल.

०१२६३ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर 

०१२६३ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ नाेव्हेबरला रात्री १० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता गोरखपूर येथे पाेहोचेल. तर ०१२६४ विशेष गोरखपूर येथून ८ नाेव्हेंबर सकाळी ८.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता एलटीटीला पोहोचेल. थांबे : ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा येथे थांबणार आहे.

०१२६९ एलटीटी -दानापूर

०१२६९ विशेष एलटीटी येथून ४ नाेव्हेबरला रात्री ११.०५ वाजता सुटली. ही गाडी दानापूर येथे ६ नाेव्हेंबरला पहाटे ३ वाजता पाेहोचेल. ०१२७० विशेष ६ नाेव्हेंबरला पहाटे पाचला दानापूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता एलटीटी येथे येईल.
थांबे : कल्याण, नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा येथे थांबा आहे.

०१२७३ एलटीटी दानापूर

०१२७३ विशेष एलटीटी येथून ५ नाेव्हेंबरला रात्री ११.०५ वाजता सुटून ७ नोव्हेंबरला पहाटे ३ वाजता दानापूरला पोहोचेल. ०१२७४ विशेष ७ नाेव्हेंबरला पहाटे पाचला दानापूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता एलटीटीला येईल. या गाडीला कल्याण, नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर असे थांबे आहेत.

एलटीटी-बनारस विशेष
०१२७९ विशेष एलटीटी येथून ६ नाेव्हेंबरला सकाळी ११.१५ वाजता सुटून बनारस येथे ७ नाेव्हेंबरला दुपारी १.२५ वाजता पाेहोचेल. तसेच ०१२८० विशेष बनारस येथून ७ नाेव्हेंबरला दुपारी ३.४० वाजता सुटून एलटीटीला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, ज्ञानपूर रोड येथे थांबणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज