नायगाव येथे ट्रक्टरची बॅटरी चोरणारा अटकेत; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | २६ ऑगस्ट २०२१ | यावल तालुक्यातील नायगाव येथे एका शेतकऱ्याच्या ट्रक्टरला असलेली १० हजार रूपये किंमतीची बॅटरी एका चोरट्याने चोरून नेल्याचे २३ ऑगस्ट रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजता यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

जावेद उर्फ भुऱ्या अहमद पिंजारी (वय-२७) रा. भुसावळ असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, सुनिल भिका शिरसाठ (वय-४६) रा. नायगाव ता. यावल हे ट्रक्टर चालक आहे. त्यांच्याकडे (एमएच ४८ टी १०८४) क्रमांकाचे ट्रक्टर आहे.

२२ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान चोरट्याने त्यांच्या ट्रक्टरला असलेल्या १० हजार रूपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात विचारपूस व शोधाशोध केली परंतू बॅटरी संदर्भात काहीच माहिती मिळाली नाही. अधिक चौकशी केली असताना जावेद उर्फ भुऱ्या अहमद पिंजारी (वय-२७) रा. भुसावळ याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी २४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजता यावल पोलीसात तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जावेद पिंजारी याच्यावर यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी पिंजारी याला यावल पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -