fbpx

सावदा येथून शेतकऱ्यांची ट्रेक्टर व ट्रॉली चोरीला

चोरीच्या घटनेत वाढ; पोलीस समोर तपासाचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ मे २०२१ । सावदा येथील कोचुर रस्त्यावरील शेतातून भागातून दि 1 रोजी एका शेतकऱ्यांची ट्रेक्टर व ट्रॉली चोरीला गेल्याची घटना घडली

सावदा येथील प्लॉट एरिया भागातील रहिवासी दिपक चिमण बेंडाळे व राजकीरण चिमण बेंडाळे, या दोघा बांधवांचे मालकीची ट्रेक्टर व ट्रॉली रावेर रोडवरील एका पेट्रोल पंपाचे मागे असलेल्या कोचुर रस्त्यावरील शेतातून उभे असतांना रात्रीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. सोबत ठिंबक सिंचन नळ्या देखील चोरून नेल्या.

एन लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असतांना व पुढील महिन्यात शेतीची महत्वाची कामे असतांना अश्या एन वेळी ही चोरी झाल्याने सदर शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. दरम्यान या बाबतीत त्यांनी सावदा पो.स्टे. ला चोरीचा अर्ज दिला आहे, असे असले तरी एन लॉकडाऊन मध्ये सावदा परिसरात चोरीच्या घटना वाढ झाल्या आहेत. मात्र पोलीस यंत्रणा याचोरी रोखण्यात अपयशी ठरल्या असतांनाच  छोट्या चोऱ्या बरोबर आता ट्रेक्टर व ट्रॉली सारख्या व ठिबक नळ्या अशी मोठ्या चोऱ्या वाढल्याने पोलिसांन समोर तपासाचे आवाहन आहे तर नागरिक मात्र वाढत्या चोऱ्या मुळे हैराण झाले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज