तोतया नवरी, दलालांचा प्रताप, आणखी ५ जणांना घातला लाखाेंचा गंडा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी नुकतेच लग्नाच्या आमिषाने गंडविणाऱ्या तोतया नवरीसह एजंटाला अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी आणखी पाच जणांना त्यांनी गंडा घातल्याचे कबूल केले आहे.

गेल्या वर्षभरात या जोडीने चाळीसगाव, भडगाव व पारोळा तालुक्यातील एकूण ६ जणांना जवळपास १२ लाख रुपयांना गंडवल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.

चाळीसगाव तालुक्यातील डामरुण येथील २८ वर्षीय तरुणाचा विश्वास संपादन करून संशयित आशा संतोष शिंदे (वय ३१, रा. सुंदरवाडी, चिखलठाणा, ता.जि. औरंगाबाद) व किरण भास्कर उर्फ बापू पाटील (वय ४५, रा. आमडदे ता. भडगाव) यांनी त्यांची फसवणूक केली. यातील आशा ही नवरी आहे. तोतयेगिरी करून या तरुणाशी लग्न करण्याचा बहाणा केला व लग्न करण्यासाठी त्याच्याकडून १२ लाख रूपये रोख व ४० हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज घेऊन ते पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने चाळीसगाव ग्रामीण पोलिस गाठत फिर्याद दिली. तोतया नवरी व तिचा साथीदार एजंटविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी चाळीसगाव पोलिसांनी आशा व किरण यांना बोलते केले.  त्यांनी वर्षभरात आणखी ५ जणांकडून प्रत्येकी ते दीड लाख रुपये घेऊन एकूण १० ते १२ लाखांचा गंडा घातल्याचा कबुली केली. यात चाळीसगाव तालुका दोन तरुणांची ता पारोळा  तालुका एक व भडगाव तालुक्यातील दोन अशा पाच तरुणांचा समावेश आहे.

पुढे येण्याचे आवाहन

डामरूण येथील तरुणाच्या फसवणूकप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लग्नाच्या नावाखाली ठगेगिरी करणाऱ्या तोतया नवरी आशा शिंदे व एजंट किरण पाटील या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. आणखी कुणाची फसवणूक झाली आहे काय? याची चाळीसगाव पोलिस चौकशी करत आहेत. तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -