लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । भुसावळ शहरातील शांती नगरातील रहिवासी परमजितसिंग गिल ( वय माहित नाही ) याने एका  २२ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गिल याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सविस्तर असे की, परमजितसिंग याचा पीडित तरुणीसोबत २०१८ मध्ये परिचय झाला. यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत दोन-तीन ठिकाणी सोबत नेले. मात्र, तरुणीने विवाह करण्याबाबत विचारणा केली असता परमजितसिंगने नकार देत जातीवाचक शिवीगाळ केली.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गिल याच्याविरुद्ध भसावळ शहर पोलिसात अत्याचार व ऑट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे हे करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज