गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्याची आज शेवटची मुदत; ९ पासून पुन्हा वसुलीचा तगादा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । जळगाव महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम शनिवारपर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे गाळेधारकांच्या हातात आता केवळ एकच दिवस शिल्लक आहे. पालिकेने देखील शनिवारी मार्केट वसुली विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दिवसभरात ५० लाखांपेक्षा जास्त वसुली झाली.

गुरुवारी गाळेधारकांनी सकारात्मक भूमिका घेत जुने बीजे मार्केट येथे चर्चा करून शनिवारपर्यंत मुदत देण्याची मागणी केली हाेती. त्यानुसार गेल्या २ दिवसांपासून महापालिकेचे पथक मार्केट परिसरात फिरकलेदेखील नाहीत. शुक्रवारी काही गाळेधारकांनी थेट महापालिका गाठत सुमारे ५० ते ६० लाखांचे धनादेश प्रशासनाकडे सादर केले आहेत. आता पैसे भरण्यासाठी शनिवारचा दिवस शिल्लक अाहे. अन्यथा महापालिकेकडून साेमवारी थेट जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -