fbpx

आज ८४ अनधिकृत फ्लेक्स हटवले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । जळगाव महानगरपालिकेच्या पथकाने बुधवारी मंगळवार प्रमाणेच शहरातील विविध भागांमध्ये जाऊन रस्त्यावरील अनधिकृत फ्लेक्स उतरवले. बुधवारी दिवसभरात एकूण ८४ फ्लेक्स महानगर पालिकेच्या पथकाने उतरवले. उद्या म्हणजेच लवकरच सर्व २० फ्लेक्स मालकांना महानगरपालिकेतर्फे शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत नोटीस बजावल्या जाणार आहेत.

 

शहरात ठिकठिकाणी अनधिकृत फ्लेक्स चा बाजार झाला आहे. जळगाव लाईव्ह देखील नुकतीच याबाबत ची बातमी प्रकाशित केली होती. मंगळवारी महानगर पालिकेच्या पथकाने असे 63 अनधिकृत फ्लेक्स उतरवले होते तर बुधवारी ८४ अनधिकृत फ्लेक्स उतरवले. या सर्व फ्लेक्स मालकांना उद्या नोटीस दिल्या जाणार आहेत.

 

उद्या शहरातील अजून काही भागांमध्ये जाऊन अशाच प्रकारे अनधिकृत फ्लेक्स काढले जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेतील सूत्रांनी दिल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज