एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळीपूर्वी आर्थिक प्रश्न सोडवणार ; परिवहन मंत्र्यांचे आश्वासन

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे. असे परिवहन मंत्री अधि. अनिल परब यांनी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेला आश्वासन दिले आहे.

सविस्तर असे की, एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळीपूर्वी आर्थिक प्रश्न सोडवण्याचे परिवहन मंत्र्यांनी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेला आश्वासन दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेने परिवहन मंत्री अधिवक्ता अनिल परब यांच्याकडे मागणी व पाठपुरावा केला. राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी मिळावी, अन्यथा २७ ऑक्टोबरला उपाेषण असे . सर्व संघटनांच्या कृती समितीतर्फे २७ ऑक्टोबरला बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.

यांनी केली मागणी 

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांनीही परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची मागणी केली. हिरेन रेडकर, कार्याध्यक्ष विजय मालोकार, प्रदीप धुरंदर, कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड उपस्थित होते.
भत्ते, थकबाकी दिवाळीपूर्वी मिळावी; अन्यथा २७ ऑक्टोबरला उपाेषण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज