fbpx

‘तो’ वाघ सदृढ, वनविभागाने चालवली १० दिवस मोहीम

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रात एक वाघ जखमी झाल्याची शंका व्यक्त केली जात होती मात्र वनविभागाने १० दिवस चालविलेल्या मोहिमेत वाघ सदृढ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शुक्रवार व शनिवारी डोलारखेडा, वायला परिसरात तीन वाघांची नोंद झाली असून, यामध्ये तीनही वाघ ठणठणीत असल्याचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांनी सांगितले.

डोलारखेडा वढोदा वन क्षेत्रातील वायला परिसरात नागरिकांना एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी याबाबत वन अधिकाऱ्यांना कळविले होते.

वाघावर उपचार करण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली होती. ठराविक भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. यामध्ये जे वाघ आढळून आले आहेत. ते सर्व वाघ वाघ सुदृढ आणि ठणठणीत आहेत, असे विवेक होशींग (उपवनसंरक्षक, जळगाव
वनविभागाने जखमी वनक्षेत्र) यांनी सांगितले.

२० ट्रॅप कॅमेरे, ४ पथक आणि २४ तास गस्त
जखमी वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाने प्रारंभी दोन पथके आणि १० ट्रॅप कॅमेरे लावून गस्त सुरु केली होती. या शोधमोहिमेत पहिल्या पाच दिवसात वाघ आढळूनच आला नाही. परत ३ पथक आणि २० ट्रॅप कॅमेरे लावून वन विभागाने २४ तास गस्त केली. यात १३ आणि १४ ऑगस्ट रोजी दोन ट्रॅप कॅमेऱ्यात वेगवेगळे पट्टेदार वाघ दिसून आले. दोन वाघांचा जंगलातील मुक्त संचार ट्रॅप कॅमेऱ्यात टिपण्यात आला. काही ठिकाणी वाघाच्या पाऊल खुणांची नोंद ही मिळाल्याने वन विभागाला दिलासा मिळाला. वनपरिक्षेत्रात वाघ जखमी नसल्याची खात्री पटली. १० दिवसानंतर देखील मोहीम कायम आहे. वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनात फिरत्या पथकाचे वनाधिकारी तथा वढोदा वनक्षेत्राचे प्रभारी वनक्षेत्रपाल बी.के.थोरात, वनपाल पी.टी. पाटील, वनरक्षक व कर्मचारी वर्ग लक्ष ठेवून आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज