fbpx

सावदा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 3 जणांना शिताफीने अटक ; 2 जण फरार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । सावदा येथे दि 9 रोजी रात्री 9 – 30 वाजे दरम्यान बस स्टॅन्ड मागील शेतात दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या 3 जणांना सावदा पोलिसांनी शिताफीने अटक केली यावेळी दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले, आरोपी जवळून सावदा पोलिसांनी 1 गावठी कट्टा, लोखंडी रॉळ, व मिरची पूड हस्तगत केली, 

सावदा पोलिसांना दि 9 रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरून सदर कार्यवाही करत बस स्टॅन्ड मागील भागात असलेल्या शेतात दरोडा टाकण्याचे उद्देशाने दबा धरून बसलेल्या संशयितांना अटक केली यात 1) मुजाहिद खान उर्फ माया उर्फ मज्जू इब्राहिम खान वय 26 रा, मदिना मज्जीद जवळ लाला गंज ब-हाणपूर, म.,प्र. 2) शेख रईस उर्फ मास शेख इस्माईल वय 28 रा. गौसिया नगर, सावदा, 3) राहुल वाल्मिक आदिवाल वय 26, रा, वाघोदा बु, ता, रावेर, या तीन जणांना पोलिसांनी अटक केली यावेळी त्यांचे सोबत असलेले आणखी 2 साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.

या बाबत पो.हे. उमेश अशोक पाटील यांचे फिर्यादीवरून सावदा पोलीस स्टेशनला भादवी 353, 399, 402, आर्मएक्त 4/25 व मु.पो.का.क. 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नी. देविदास इंगोले यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस करीत आहे दरम्यान सदर आरोपीना 10 रोजी  न्यायालयात उभे करण्यात आले असता त्यांना दि12 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सावदा पोलीस करीत आहे,

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज