भुसावळ विभगातील मेमू सुरू करण्यासाठी दुसऱ्यांदा प्रस्ताव रवाना

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । काेराेनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली पॅसेंजर सेवा अद्यापही सुरु झालेली नसून यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दरम्यान, या पॅसेंजर गाड्या आता पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहे. भुसावळ विभगातील तीन मेमू गाड्या सुरू करण्यासाठी दुसऱ्यांदा जीएम कार्यालयाने प्रस्ताव मागविल्याने साेमवारी हा प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात आला आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मार्च २०२० पासून पॅसेंजर गाड्या बंद केल्या आहे. यामुळे प्रवाशांचे माेठ्या प्रमाणावर हाल हाेत आहेत. मात्र आता कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून हळूहळू सर्व क्षेत्र सुरू होत आहेत. रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून आणि प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून अद्यापही पॅसेजर गाड्या सुरू केल्या जात नसल्याने अडचण कायम आहे. गेल्या महिन्यात पॅसेंजर गाड्यांऐवजी मेमू गाड्या सुरू कराव्यात या आशयाचा प्रस्ताव पाठवण्यात आला हाेता.

मात्र साेमवारी पुन्हा दुसऱ्यांदा जीएम कार्यालयाकडून मेमू गाड्या सुरू कराव्यात यासाठी प्रस्ताव मागवण्यात आला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने नवीन प्रस्ताव पाठवला आहे. यात खंडवा, बडनेरा व देवळाली या तीन मार्गांवर तीन नवीन मेमू गाड्या सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. यामुळे मेमू गाड्या कधी सुरू होतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. आरक्षण तिकीट मिळत नसल्याने प्रवासी वैतागले आहेत. त्यामुळे मेमू सुरू करून गैरसाेय दूर करावी, अशी मागणी हाेत आहे. वाणिज्य आणि परिचलन विभागातर्फे हा प्रस्ताव साेमवारी मुंबईत पाठवला आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज