अपघातांची मालिका सुरूच : भरधाव वाहनाच्या धडकेत तिघे ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून दररोज कुठे ना कुठे अपघातात जीव जात आहे. रात्री भडगाव ते एरंडोल मार्गावर भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात सोमवारपासून भीषण अपघातांचे सत्र सुरू असून दररोज अनेकांना जीव गमवावा लागत आहे. जामनेर तालुक्यात गारखेडा आणि काल पाचोरा रस्त्यावर झालेल्या अपघातात ६ जणांना जीव गमवावा लागला. दोन्ही घटना ताज्या असतानाच काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एरंडोल-भडगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला.

एरंडोल ते भडगाव रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. रात्री साधारणपणे साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीवर असणारे तिघे जागीच ठार झाले. यात बलदीप सुकटा पवार (वय ३२), बबलू बच्चन भोसले (वय २२) आणि गोटू पिंटू चव्हाण (वय १२) या तिघांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. तर संबंधीत वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या अपघातातील मृतदेह शव विच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत. तर रात्री उशीरापर्यंत या संदर्भात कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -