हलखेडा खून प्रकरणी आणखी तिघांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील खून प्रकरणी आणखी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटकेतील संशयित आरोपींची संख्या पाच झाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील हे कारने मित्र अनिल निकमसोबत शेगाव येथे दर्शनासाठी जात हाेते. वाटेत हलखेडा (ता. मुक्ताईनगर) गावात असलेल्या परिचयातील व्यक्तीच्या भेटीसाठी गेले हाेते. त्यानंतर आधीच गावाजवळील जंगलात उपस्थित असलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांना पैशांच्या वादातून मारहाण केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नांदुरा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ताे गुन्हा मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दादाराव हरबन्सी पवार व अजय दादाराव पवार या बाप-लेकांना यापूर्वीच अटक केली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून सागर सुनील पवार (वय-२६, रा. महालखेडा सिनफाटा) फिरोज कामाजी पवार (वय-२०, रा. मधापुरी, ता.मुक्ताईनगर) व ईशेष उर्फ इशा लक्ष्‍मण भोसले (वय-२२ रा. चाळीसगाव फाटा, मालेगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या खून प्रकरणातील संशयितांची संख्या आता ५ वर पोहोचली आहे. काही संशयितांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज