चोपड्याच्या आमदारांच्या संपर्कातील तिघे पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । चोपड्याच्या आमदार लता सोनवणे या मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांच्या संपर्कात आलेले आणखी तीनजण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. तसेच त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांनी चोपडा येथे त्यांचे स्वॅब दिले होते. मात्र, त्यांचे पत्ते शहरातील आहेत.

जिल्ह्यात आता एकूण नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी एकजणही कोरोनामुक्त झाला नाही. सध्या हे सर्व रुग्ण ग्रहविलगीकरणात आहेत. आमदार लता सोनवणे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर चोपड़ा येथील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्या संपर्कातील काही जणांचे स्वब तपासले. त्यात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह इतरांचे स्वब निगेटिव्ह आले आहेत. मात्र, आज सकाळी आलेल्या अहवालांमध्ये कुटुंबातील इतर तीनजण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करून घ्यावी आणि सर्वानी कोरोना नियम व निर्बंधांचे पालन करावे असे आवाहन आमदार लता सोनवणे यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -