गुटखा तस्करीप्रकरणी तिघांना पकडले, पाऊण लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । भुसावळ येथे राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा बाळगून तो विक्रीसाठी रिक्षातून नेणाऱ्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी रोजी अटक केली. त्यांच्याकडून २८ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रशांत सोनार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला.

बाजारपेठ पोलिसांना काही संशयित सिंधी कॉलनीत गुटखा घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्यात बुधवारी दुपारी साडेचारला शहरातील जुन्या श्रीचंद दरबार सिंधी कॉलनी जवळ एक रिक्षा (एमएच.१९-बीयू.३०४६) आली. त्यातून पोलिसांनी नवीन मोहनदास सोबानी (वय २८, रा.हनुमान नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ), भानुदास भीमराव तायडे (वय २७, रा.वांजोळा, ता.भुसावळ) व सय्यद सर्फराज अली इलियाज अली (वय २५, रा.मारुळ, ता.यावल) यांना ताब्यात घेतले. रिक्षाची तपासणी केल्यावर त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला २८ हजार रूपयांचा गुटखा आढळला. यानंतर गुटखा व रिक्षा मिळून ७८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई एपीआय हरीष भोये, गणेश धुमाळ, उपनिरीक्षक महेश घायतड, प्रशांत सोनार, ईश्वर भालेराव, जीवन कापडणे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, बंटी कापडणे, अतुल कुमावत यांनी केली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -