fbpx

दुचाकी चोरणार्‍या तिघांच्या आवळल्या मुसक्या ; भामट्यांकडून ७ दुचाकी हस्तगत

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । जळगाव शहरासह पाचोरा, सोयगाव तालुक्यातून दुचाकी चोरणार्‍या तिघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज शुक्रवार मुसक्या आवळल्या आहे.  शुभम राजेंद्र परदेशी (वय २१) दीपक सुनील खरे (वय २२) व शुभम शांताराम माळी (वय २१) तिन्ही रा.शहापुर ता.पाचोरा अशी अटक केलेल्या संशयितांचे नावे आहेत. दरम्यान, तिघांकडून सात चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याबाबत असे की, जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाक्या चोरीस गेल्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील शहापूर येथील महाविद्यालयीन तरुण दुचाकी चोरी करत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयकुमार बकाले यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, विजय पाटील, प्रदीप पाटील, नरेंद्र वारुळे, दादाभाऊ पाटील, जयवंत चौधरी, गजानन पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन महाजन, राहुल बैसाणे, अशोक पाटील, मुरलीधर बारी या कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले होते.

पथकाने माहिती काढून शुभम परदेशी व दीपक खरे व शुभम माळी या तीन जणांना आज अटक केली. त्यांनी जळगाव शहरातील रामानंदनगर, पाचोरा शहर तसेच सोयगाव ता.अौरंगाबाद येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt