तरुणीची छेड काढून धमकावले, दोघांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । शिरासमणी (ता.पारोळा) येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा छेड काढून,लग्नाचे आमिष दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.ही घटना १० रोजी घडली असून,या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की,१५ वर्षीय पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार गावातील संशयित सायबू उर्फ समाधान मागू पाटील व भावेश गोटू वंजारी हे पीडित तरुणीचा सतत पाठलाग करून छेड काढत होते.१० रोजी पीडित तरुणी पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना संशयित सायबू याने तिला लग्नाची मागणी केली.तसेच लग्न न केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी संशयिताने पीडीतेला चाकूचा धाक दाखवला होता.यामुळे पीडित तरुणी प्रचंड घाबरली.घरी आल्यानंतर तिने घरात ठेवलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान,आईवडिलांनी तिला पारोळा येथे खासगी दवाखान्यात हलवले.चार दिवस उपचार घेतल्यानंतर १४ रोजी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी पीडीतेचा जबाब नोंदवला. त्यानंतर दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.या प्रकरणामुळे शिरासमनी गावात खळबळ उडाली आहे.पोलिस तपासात आणखी कोणत्या बाबींचा उलगडा होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -