एसटीच्या संपकाळात भुसावळ डेपोतून ६४ हजारांचे साहित्य चोरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । एसटी कर्मचाऱ्यांनी विलानीकरणासाठी पुकारलेल्या संपाच्या काळात भुसावळ येथील आगारातील ६४ हजार ६०० रूपये किमतीच्या विविध साहित्याची चोरी झाली. गुरुवारी ही चोरी उघड होताच आगार प्रमुखांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

भुसावळ एसटी आगारातील स्प्रिंग, टायरसह अन्य साहित्य अज्ञात चाेरट्याने लंपास केले. गुरुवारी चाेरीची ही बाब आगारप्रमुख पी.बी.चाैधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी आगार परिसरातील पाहणी केली असता कुठेही साहित्य सापडले नाही. त्यामुळे आगार प्रमुख चाैधरी यांनी येथील बाजारपेठ पाेलिस ठाण्यात अज्ञात चोरच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजची पोलिस पाहणी करणार आहे.

हे देखील वाचा:

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -