fbpx

‘त्या’ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करावी; एमआयएमची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणावर बोदवड पोलिसांकडून अमानवीय कृत्य करण्यात आले असून असे अमानुष कृत्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी एमआयएम पक्षातर्फे करण्यात आली आहे.

याबाबत नुकतेच एमआयएम पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. खालिद परवेज यांच्यातर्फे पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. बोदवड घटनेच्या संदर्भात डॉ. खालिद परवेज यांनी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसह जळगावला भेट दिली. शिष्टमंडळाने प्रथम पिडित कुटुंबाची भेट घेतली आणि संशयित आरोपी मजलिसच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आणि कुटुंबाला सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जाऊन पीडित तरुणाची भेट घेतली. त्यानंतर शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष अहमद शेख, नंदुरबार जिल्हाध्यक्ष हाजी जीशान पठाण, जळगाव लोकसभा अध्यक्ष ऍड. इम्रान साहिल, महानगर अध्यक्ष सय्यद दानिश, उत्तर महाराष्ट्र सदस्य रैय्यान जहागीरदार, रशीद खान, जुबेर देशमुख, उत्तर महाराष्ट्र सहसचिव फिरोज शेख , सानिर सैय्यद, जळगाव जिल्हा महासचिव ईम्रान खान आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज