fbpx

यावल नगरपरिषदेला लवकरच विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार

mi-advt

फैजपूर प्रतिनिधी: यावल नगरपरिषदेला यावल शहराच्या विकासासाठी विशेष रस्ता अनुदान व वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदान अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती नगरअध्यक्षा मा.नौशाद मुबारक तडवी यांनी केली होती.

आ.शिरीषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त काल यावल नगरअध्यक्षा नौशाद तडवी व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते मुबारक तडवी यांनी आ.चौधरी यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.लवकरच यावल नगरपरिषदेला विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी आ.शिरीषदादांनी दिले असल्याचे नगराध्यक्षा नौशाद तडवी व मुबारक तडवी यांनी दैनिक जळगाव वृत्त प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt