मतदारांचा विश्वास आणि पक्षातील एकजुटीचा हा विजय : जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत काँग्रेसने ३ जागांवर विजय मिळविला आहे. मतदारांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास व काँग्रेसमधील एकजुटीमुळे आम्ही या ३ जागा जिंकू शकलो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस भवनात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शिरीष चौधरी, महानगराध्यक्ष शाम तायडे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, विजयी उमेदवार जनाबाई महाजन, शैलेजा निकम आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आम्ही ४ जागांची मागणी केली होती. मात्र १ जागा आम्हाला राजकीय खेळीमुळे गमवावी लागली. नाहीतर आम्ही सर्व चार जागा जिंकलो असतो. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जसे आदेश देतील त्या पदधतीने लढविल्या जातील, असे सांगून जिल्हा बँक निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेविरोधात जाणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

२०-२० महिन्यांचा फॉर्मुला
महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी २०-२० महिन्यांचा फॉर्मुला ठरला असून त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस व शिवसेनेच्या उमेदवारांना अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची संधी मिळणार आहे. याबाबत कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज