तळीरामांसाठी खुशखबर.. महाराष्ट्रात थर्टी फर्स्टला मिळणार स्वस्त दारू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । गेल्या काही दिवसापूर्वी ठाकरे सरकारने (Thackeray government) आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आयात करण्यात आलेल्या स्कॉचवरील उत्पादन शुल्क 50 टक्के कमी केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील स्कॉच व्हिस्कीची (Scotch whiskey) किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने होईल.

दरम्यान, टॅक्स कमी झाल्यामुळे मद्य स्वस्त होईल अशी अपेक्षा मद्यप्रेमींना होती. मात्र दुकानात जुना दारूचासाठा असल्याने अद्यापही दारूचे दर कमी झालेले नाहीत. मद्याप्रेमींसाठी दिलासा देणारी बातमी म्हणेज ख्रिसमसच्या आसपास विदेशी दारूचा नवासाठा उपलब्ध होणार असल्याने त्यांना ख्रिसमस सेलेब्रेशनसाठी (Christmas Celebration)
स्वस्तात दारू खरेदी करता येऊ शकते.

महाराष्ट्र सरकारने विदेशी मद्यावरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार विदेशी मद्यावरील टॅक्समध्ये जवळपास निम्मी कपात करण्यात आली आहे. पूर्वी विदेशी मद्यावर 300 टक्के टॅक्स आकारण्यात येत होता. आता त्यामध्ये कपात करून तो 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

परंतु दुकानात अजूनही दारूचा जुनाच साठा असल्याने, दारू पुर्वीच्याच दराने विकली जात आहे. येत्या दहा दिवसांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दुकानात नवासाठा येऊ शकतो. हा नवा मद्यासाठा आल्यास दारू स्वस्त मिळेल. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे अनेक देशांनी प्रतिबंध लागू केले आहेत. त्यामुळे दारू आयात करण्यामध्ये अनेक निर्बंध येत असल्याचे दारू विक्रेत्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे दारू विक्रीमध्ये वाढ होऊन, महसूल वाढणार आहे. तसेच दारू स्वस्त झाल्यामुळे दारू तस्करीला देखील आळा बसेल.दारूवरील टॅक्स कमी केल्याने सर्वच प्रकारच्या विदेशी मद्याचे दर हे 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

या कंपन्यांचे असे आहेत दर?

जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर – ५७६० तर नवीन दर – ३७५० रुपये
जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर – ३०६० तर नवीन दर – १९५० रुपये
जे ॲण्ड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर – ३०६० तर नवीन दर २१०० रुपये
जेम्सन ट्रिपल डिस्टल्ड आयरिश व्हिस्की -जुना दर – ३८०० तर नवीन दर २५०० रुपये
ब्लॅन्टाइन्स फाइनेस्ट ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर -३०७५ तर नवीन दर – २१०० रुपये
शिवास रिगल (१२ वर्षे जुनी) ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर ५८५० तर नवीन दर ३८५० रुपये
जॉर्डन्स लंडन ड्राय जीन – जुना दर २४०० तर नवीन दर १६५० रुपये

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -