चक्क चोरट्यांनी पार्किंगला लावलेली कार लांबवली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । तालुक्यातील उमाळा फाटा येथून पार्किंगला लावलेली गाडी मालक साकीब अली सैय्यद जाकीर अली (वय-२२) यांची कार अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी साकीब अली यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, साकीब अली सैय्यद जाकीर अली (वय-२२) रा. मकरा कॉलनी, कुसुंबा शिवारात ता.जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे (एमएच ०४ जीडी ८२१९) क्रमांकाची टाटा इंडिगो कार आहे. १८ रोजी रात्री १२.३० वाजता त्यांनी कार कुसुंबा फाट्याजवळील औरंगाबाद-जळगाव रोडवर पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंग लावलेली ९५ हजार रुपये किंमतीची टाटा इंडिगो कार चोरुन नेल्याचा प्रकार रविवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला.

परिसरात शोधाशोध केली असता कार कुठेच आढळून आली नसल्याने त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली.साकीब अली यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफुर तडवी करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -