डॉक्टर झाेपताच चाेरट्यांनी लांबवला अडीच लाखाचा ऐवज

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । डॉक्टर घरात झोपलेले असताना चोरट्याने धाडसाने प्रवेश करून कपाटाच्या लॉकरचा दरवाजा उघडून त्यातील ५ लाख रुपयांपैकी २ लाख ६० हजार रूपये चोरून पोबारा केला. ही घटना कॅप्टन कॉर्नर चाैकात ११ रोजी दुपारी ४.३० ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान घडली.

डॉ. विवेक बळवंतराव बोरसे (वय ४०) हे कुटुंबांसह कॅप्टन कॉर्नर येथे राहतात. पाच ते सहा दिवसापूर्वी त्यांच्या पत्नी व मुली मुंबई येथे माहेरी गेल्या होत्या. ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. विवेक बोरसे हे घराला कुलूप लावून आपल्या हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलचे काम आटोपून दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास ते घरी परतले. घरात आराम करण्यासाठी बेडरूममध्ये गेले.

सायंकाळी ७ वाजता डॉ. बोरसे झोपेतून उठले असता त्यांना घरातील लोखंडी कपाटाला चावी लावलेली दिसली. डॉक्टरांनी लोखंडी कपाट उघडून पाहिले असता त्यांनी कपाटात ठेवलेले ५ लाख रुपयांपैकी २ लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरट्याने लांबवल्याचे दिसून आले. यानंतर डॉ. विवेक बोरसे यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या-विरोधात कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -