चोरट्यांनी एकाच वेळी तीन मोबाईल लांबविले; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । दोन विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हितेश प्रशांत बहऱ्हाटे ( वय १७, रा. एसएमटी कॉलेज जवळ ) याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. त्यानंतर पुढे काही अंतरावर या दोघांनी आणखी गायत्री अमरलाल अडवाणी (रा. सिंधी कॉलनी) व अनुज पवार (रा. गणेश कॉलनी) या दोघांचे मोबाईल हिसकावल्याच्या घटना रविवारी सायंकाळी गणेश कॉलनी व आकाशवाणी चौक या परिसरात घडली. याप्रकरणी रात्री हितेश बन्हऱ्हाटे याच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हितेश बन्हऱ्हाटे हा शिक्षण घेत आहे. रविवारी सायंकाळी आई पूनम यांचा मोबाईल घेऊन तो गणेश कॉलनी परिसरात पेट्रोलपंप नजीक टफन लावण्यासाठी आला होता. दुकानदाराने टफन लावल्यानंतर त्याने हितेशच्या हातात मोबाईल दिला. त्याचवेळी काळ्या व लाल रंगाची विना क्रमांकाच्या दोन दचाकीवरून दोन जण आले. त्यांनी हितेशच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. त्यानंतर या दोघांनी आकाशवाणी चौक ते सिंधी कॉलनी रस्त्यावर गायत्री अडवाणी यांचाही मोबाईल हिसकावला. त्यानंतर रिंगरोडवर ही अनुज पवार यांचाही मोबाईल या दोघांनी लांबविला.

तिघे रात्री एकाचवेळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आले होते. हितेश बन्हऱ्हाटे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदोलकर करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज