शिरसोलीत दुकान समजून चोरट्यांनी फोडली मुतारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ ।  शिरसोली प्र. बो. मध्ये चक्क एका चोरट्याने दुकान समजून मुतारी फोडल्याची घटना १० रोजी रात्री घडली. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असतांना ग्रामपंचायतीचे नुकसान झाले आहे.

सविस्तर असे की, शिरसोली प्र.बो. येथील जळगाव पाचोरा रस्त्यावर एस. टी. स्टँडजवळ महिला व पुरुषांसाठी तीस वर्षांपूर्वी मुतारी बांधली आहे. १० रोजी एका चोरट्याने रात्री अंधारात दुकान समजून ही मुतारी फोडली. या फोडलेल्या मुतारीची दिवसभर चर्चा होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज