विद्युत पंप चोरीप्रकरणी चोरांना न्यायालयीन कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथील शेतकऱ्याचा विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. दरम्यान या गुन्ह्यात मेहुणबारे पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. आता तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथील शेतकरी उद्धव मगर (37) यांचे उपखेड शिवारात शेत आहे. जवळच गिरणा नदी असल्यामुळे त्यांनी गिरणा नदीपात्रात इलेक्ट्रिक मोटर बसली आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील काही विद्युत पंप त्याठिकाणी लावलेली आहे. 22 सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक मोटर आणि टेबल वायरी चोरून नेल्याचे उघडकीस आले होते. उद्धव मगर यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

संशयित आरोपी गणेश पाटील (28), दिनेश ठाकरे (21), दिगंबर खैरनार (23)सर्व रा.उपखेड यांना 24 सप्टेंबर रोजी मेहुणबारे पोलिसांनी अटक केली होती. त्यांची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज