fbpx

शिक्षीकेच्या घरातून महागड्या साड्या चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ ।  जळगाव शहरातील शिक्षीकेच्या घरातून महागड्या साड्या चोरी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील चोरट्यास एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. भोलासिंग जगदशीसिंग बावरी (वय २८, रा. शिरसोली नाका) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून साड्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

याबाबत असे की, जळगाव शहरातील जीवनमोती कॉलनीतील शिक्षिका वृंदा गणपतराव गरुड या पतीसह पुणे येथे त्यांच्या मुलीकडे गेले होते. दरम्यान वृंदा गरुड या गेल्या एक महिन्यापासून बाहेर गावी असल्यामुळे त्यांचे घर बंद होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश मिळवला. घरातील कपाटातून चोरट्यांना त्यांच्या घरातून दोन ते चार हजार रुपये किमतीच्या एकूण १० महागड्या चोरल्या होत्या. 

घराचा दरवाजा उघडा असल्याचे शिक्षीका वृंदा गरुड यांच्या पुतण्याच्या निदर्शनास आले. पुतण्याने त्यांना या घटनेची माहिती दिली. माहीती मिळताच त्या धुळे येथून लागलीच जळगावला परत आल्या. घराची पाहणी केली असता साड्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात पोलिसांनी बावरी याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या साड्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. सन २०१२ पासून नऊ वर्षात बावरी याच्यावर एकुण १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हिस्ट्रीशिटर्सच्या यादीत तो अग्रस्थानावर आहे. बावरी याला हद्दपारही करण्यात आले आहे. दरम्यान, त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज