एरंडोल शहरासाठी ३२ कोटी ५० लाखाची नवीन पाणी पुरवठा योजना होणार – आ.चिमणराव पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । एरंडोल येथे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन वाढीव वस्तीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी ३२ कोटी ५० लाख रुपयाची नवीन पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल. अशी माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी येथील तहसील कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठक प्रसंगी दिली.

आमदार चिमणराव पाटील यांनी एरंडोल नगरपालिकेचे प्रशासक विकास नवाळे यांना सदर पाणीपुरवठा योजनेसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली. आपण लवकरच या योजनेला मंजुरी आणू अशी आमदार चिमणराव पाटील यांनी ग्वाही दिली. या योजनेअंतर्गत ८० किलोमीटर लांबीची नवीन जलवाहिनी व पाण्याचे चार जलकुंभ नगरपालिका परिसर ओम नगर श्रीराम नगर उत्तम नगर या भागात उभारण्यात येतील. तसेच जलशुद्धीकरण केंद्राची चार एमएलटी ने क्षमता वाढवण्यात येईल. तसेच अंजनी धरणातील पाणी योजनेच्या उद्धव स्थळी २० एचपी ची मोटार व १०० एचपीचा पंप बसविण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. या नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे वाढीव शेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे तसेच शहरातील पाणीपुरवठा सुद्धा सुरळीत होणार आहे. कोविड सेंटर व ऑक्सिजन व्यवस्था अद्यावत करून घ्या लसीकरणाचे काम वाढवा मास्क लावण्यासाठी जनजागृती करा अशा प्रकारची सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी कोरोना आढावा बैठकीत केली.

यावेळी प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण, नगर पालिका प्रशासन विकास नवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील, गट विकास अधिकारी बी.एस अकलाडे, डॉक्टर निशात शेख, डॉक्टर अरविंद वानखेडे, डॉक्टर धीरज मराठे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, शालिक गायकवाड आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -