जिल्हात दिवसभरात एकही कोरोना रुग्ण नाही

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । आज जळगाव जिल्ह्यात दिवसभरात एकही रुग्ण आढळलेला नाही. तर दोन रुग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 737 बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 1 लाख 40 हजार 158 रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे 2 हजार 575 रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या चार रुग्ण ॲक्टिव्ह असून आज २ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज