fbpx

ऑप्टिकल फायबरची चोरी, दोघांवर तालुका पोलिसात गुन्हा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । शहरातील खोटेनगर परिसरात ऑप्टीकल फायबर केबल वायर चोरून नेल्याप्रकरणी दोन जणांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेश्वर कॉलनीतील रहिवासी असलेले घनश्याम दत्तात्रय फालक (वय-४५) हे केबलचालक आहे. खोटेनगर ते साईनगर दरम्यान त्यांच्या मालकीची ऑप्टीकल फायबर केबल वायर टाकण्यात आल्या आहेत. फालक यांच्याकडे काम करणारे संजय कुमावत व दीपक माळी हे नागरिकांकडून परस्पर पैसे घेत असल्याचे समजल्याने त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्याचा राग मनात ठेवून त्यांनी केबल तोडून चोरी केल्याची घटना दि.२५ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली.

ही चोरी संजय मोतीलाल कुमावत रा. हरीविठ्ठल नगर आणि दिपक बन्सीलाल माळी रा. जळगाव यांनी केली असल्याने घनश्याम फालक यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज