fbpx

चाळीसगावात गॅस सिलेंडरची चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । घरा बाहेरील आवारात भरलेले चक्क तीन गॅस सिलेंडर अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना हनुमानवाडी येथे घडली आहे.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

शहरातील हनुमानवाडी येथील लक्ष्मीकांत गोविंद कुलकर्णी (वय-६१) रा. हनुमानवाडी, चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून आयडीबीआय बॅंकेतून ते सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास घरात विद्युत पुरवठा खंडित असताना कुलकर्णी हे इन्व्हर्टरवर टेलीव्हीजन पहात होते.

mi advt

त्यावेळी अचानक स्वयंपाक गृहातील ग्रॅस सिलेंडर संपल्याने  कुलकर्णी हे रात्री ९:४५ वाजता घराच्या कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या एच.पी कंपनीच्या गॅस सिलेंडर घ्यायला गेले. मात्र एच.पी कंपनीच्या भरलेले ३ गॅस सिलिंडर मुळ ठिकाणी दिसून आले नाही. त्यावर त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता  ४,३५० रूपये किंमतीचे गॅस सिलेंडर मिळून आले नाही. म्हणून अंधाऱ्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुलकर्णी यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून  अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करणे सुरू आहेत.

याआधीही घराच्या कंपाऊंडमध्ये ठेवलेले २ गॅस सिलिंडर अज्ञाताने चोरून नेले असून याप्रकरणी कुठेही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज