fbpx

चोरटक्की येथून दीड लाख रुपये किमतीच्या चार बैलांची चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ । एरंडोल तालुक्यातील चोरटक्की येथे गावालगत असलेल्या शेतातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे दोन बैलजोड्या, व दोन लहान गोरे, अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे रविवारी उघडकीस आले.

विजय पुंडलिक पाटील, व बाळकृष्ण पाटील या दोघांच्या बैलांची चोरी झाली. याबाबत एरंडोल पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा केला आहे. हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज