पळासखेडात गायीची चोरी; चोरट्यांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । पळासखेडे ( ता.भडगाव ) येथील एका शेतकऱ्याची गावरान जातीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.ही चोरी १६ रोजी झाली. या प्रकरणी अजय भवरे यांच्या फिर्यादीवरून येथील पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, अजय रामदास भवरे (वय-२७) रा.पळासखेडे ता.भडगाव जि.जळगाव हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे गाई आहेत. त्यांच्या खळवाडीतील गोठ्यातून अज्ञात व्यक्तीने शुक्रवार १६ डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची ३२ हजार रुपये किमतीची गावरान जातीची गाय चोरून नेले. या प्रकरणी अजय भवरे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मनोज माळी करीत आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -