चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी शिवारातून गुरांची चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी शिवारातील एका व्यक्तीच्या शेतातील शेडमध्ये बांधलेली गाय व गोऱ्हा एका अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथील विलास कारभारी घुले यांच्या शेतातील शेडमध्ये बांधलेला एक गोऱ्हा व गाय अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. यातील विलास कारभारी घुले यांचा वीस हजार रुपये किमतीचा गोऱ्हा तर रामहरी गंगाधर काटे (रा. रोहिणी) यांची पंधरा हजार रुपये किमतीची गाय होती. विलास कारभारी घुले हे २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुरांना चारा-पाणी करून झोपण्यासाठी घरी निघून गेले होते. सकाळी ६ वाजता शेतात आले असता त्यांना जनावरे दिसून आले नाही. परिसरात शोधाशोध केल्यानंतरही जनावरे मिळून न आल्यामुळे त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेतली. घुले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोहेकॉ. पगारे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज