१२ क्विंटल कापसाची चोरी; ७ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । पाळधी ( ता. जामनेर ) येथे सात जणांनी १२ क्विंटल कापूस चोरून नेल्याचा प्रकार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११  वाजता उघडकीला आला आहे. या प्रकरणी रमेश दामू सुशिर यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, रमेश दामू सुशिर (वय ६९,) रा. पाळधी ता. जामनेर जि. जळगाव यांचे पाळधी शिवारात शेत आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गावातील भावलाल दामु सुशिर (वय-७१), परमेश्वर भावलाल सुशिर (वय-२७), ज्ञानेश्वर भावला सुशिर (वय-३२), दिलीप माधव सुशिर (वय-४५), संजय माधव सुशिर (वय-४३), राजेश माधव सुशिर (वय-४१) आणि बेबाबाई दिलीप सुशिर (वय-४१) रा. पाळधी यांनी शेतातून ८० हजार रूपये किंमतीचे १० ते १२ ‍क्विंटल कापूस चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

याप्रकरणी रमेश दामू सुशिर यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र परदेशी करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज