fbpx

जळगावात घरफोडीचे सत्र सुरूच ; सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून हजारोंचा मुद्देमाल लंपास

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । शहरातील घरफोडयांचे सत्र सुरूच असून गुरुवारी पुन्हा एक घरफोडी समोर आली आहे. मेहरूण परिसरातील गणेशपुरीत राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी घरफोडी करीत ६४ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

गणेशपुरी परिसरात राहणारे युनुस कालु खान वय-६४ हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. दि.१२ जुलै रोजी ते पत्नीसह मुलाच्या घरी ठाणे येथे गेले होते. बुधवारी सकाळी ६.३० वाजता ते घरी आले असता घराबाहेरील कंपाऊडला कुलुप लावलेले होते. ते उघडून आत गेले असता घराचे मेन दरवाजाचे कुलुप लावलेली कडी तुटलेली दिसली.

चोरट्यांनी घरातील कपाट फोडून ४० हजार रोख, १२ हजारांची सोन्याची चेन, १२ हजारांचे कानातले व अंगठी असा ६४ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज