पतीच्या निधनामुळे गावी असलेल्या महिला प्राचार्याचे घर फोडले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातील राहणाऱ्या महिला प्राचार्या पतीच्या निधनामुळे गावी होत्या. बऱ्याच दिवसापासून घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील लेक सिटी परिसरात राहणाऱ्या प्राचार्या कृष्णा कठुरीया यांचे पती मनीष कठुरीया यांचे अपघाती निधन झाले असून त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरी निमित्त राहतो. प्राचार्या कृष्णा कठुरिया या अमरावती येथील इंग्रजी शाळेत नोकरीला असून तेथेच राहतात. त्यामुळे त्यांचे जळगाव येथील मेहरुण तलाव परिसरातील घर नेहमी बंदच असते. पतीच्या निधनानंतर त्यांचे जळगावी फारसे येणे होतच नव्हते. दि.४ डिसेंबर रोजी सायंकाळी कृष्णा कठुरीया यांना त्यांच्या जळगाव येथील घराशेजारी राहणारे सागर जाधव यांचा फोन आला कि, तुमच्या घराचे कुलूप व कडीकोंडा तुटलेला असून घरात चोरी झालेली आहे. घरात चोरी झाली असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी दि.७ डिसेंबर रोजी जळगाव येथील घर गाठले.

चोरट्यांनी घरात डल्ला मारत ८ हजार रुपये किमतीचे २ लॅपटॉप, २ हजाराची पाण्याची टिल्लू मोटर, २ हजाराचा सोनी कंपनीचा कॅमेरा , बाथरुममधील पाण्याचा स्टीलचा नळ, पितळी घंटी, मोटार सायकल व चार चाकी वाहनाचे आरसी बुक, दोघा पती पत्नीच्या नावाचे ड्रायव्हींग लायसन्स, डेबीट व एटीएम कार्ड असा 12 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.

मनीष कठुरीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar