चोपड्यात नगरसेवकाच्या घरी चोरी; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । चोपडाचे नगरसेवक अशोक बाविस्कर यांच्या विद्याविहार कॉलनीतील घराच्या चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून २५ हजार किंमतीचा टीव्ही व ४० हजारांची रोकड असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २९ रोजी घडली. या प्रकरणी बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

नगरसेवक बाविस्कर २२ रोजी आपल्या कुटुंबासह शहरातील बारी वाड्यातील जुन्या घरी रेशन वाटप करण्यासाठी गेले होते. २९ रोजी सकाळी त्यांच्या विद्याविहार कॉलनीतील, दुमजली घरातील भाडेकरू सतीश सोनवणे यांनी त्यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती कळवली. त्यांच्या घरातील दरवाजाचे कुलूप व कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. माहिती मिळाल्यावर बाविस्कर यांनी त्वरित घर गाठले. त्यावेळी ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -