भुसावळात उद्यापासून सुरू होणार थिएटर ; ‘या’ टॉकीजमध्ये केले चार शोचे नियोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । कोरोनामुळे १५ मार्च २०२० रोजी बंद झालेले चित्रपटगृहे आता २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. मात्र, त्यासाठी कोविड नियमांनुसार ५० टक्के आसन क्षमतेत मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. ते पाळून शहरातील वसंत टॉकीजमध्ये शुक्रवारी नेहमीप्रमाणे ४ शो होतील. पांडुरंग टॉकीज तूर्त बंद आहे.

कोविडच्या पहिल्या लाटेपूर्वी १५ मार्च २०२० रोजी शहरातील चित्रपटगृहे बंद झाली होती. पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने चित्रपटगृहांना काही दिवसांसाठी परवानगी दिली होती. मात्र, प्रेक्षक नसल्याने ती बंदच होती. यानंतर पुन्हा दुसरी लाट आल्याने चित्रपटगृह सुमारे पावणेदोन वर्षांपासून बंदच आहेत.

आता शासनाने दिलेल्या परवानगीनुसार शहरातील वसंत टॉकीजमध्ये शुक्रवारपासून चित्रपटांचे प्रदर्शन सुरु होईल.त्यात शुक्रवारी पहिल्याच दिवशी ओटीपी प्लेटफार्मवरील ‘बेलबॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. तर सध्या दुरुस्तीची कामे सुरु असल्याने पांडुरंग टॉकीज तूर्त सुरु होणार नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज