fbpx

जळगावात दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणास रंगेहात पकडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । जळगाव शहरात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना घडतच आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आता दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरास रंगेहात अटक करण्यात आली आहे.

शहरातील घाणेकर चौकात पार्किंगला लावलेली यावल येथील व्यापाऱ्याची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबवितांना एका तरूणाला रंगेहात पकडले आहे. विनेश चंपालाल बंडोर (वय-२७ रा. अंजनगाव ता. सेंधवा जि. बडवाणी (म.प्र)) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mi advt

याबाबत असे की, यावल येथील कटलरी किराणा मालाचे व्यापारी अझहर खान फारूख रेहमान खान (वय-३७)  हे किरणा भुसार माल घेण्यासाठी गुरूवारी १३ मे रोजी जळगाव शहरातील घाणेकर चौकात दुचाकीने आले. त्यांनी चौकातील हॉटेल सावरिया येथे दुचाकी (एमएच १९ एएफ १५८६) पार्किंगला लावली.  किराणाचा होलसेल माल घेण्यासाठी दुकानावर निघाले. दुकानावर उभे असतांना अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून गाडीला किक मारली असता दुचाकीच्या सायलेन्सरच्या आवाज अझहर यांनी ओळखला. त्यांनी दुचाकीकडे पाहिले तर चोरट्या दुचाकी घेवून पळ काढत होता. दरम्यान, त्यांचा पाठलाग करून रंगेहात पकडून शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विनेश चंपालाल बंडोर (वय-२७) रा. अंजनगाव ता. सेंधवा जि. बडवाणी (म.प्र) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अझहर खान यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज