fbpx

पोलिसांनी दारूसाठी पैसे न दिल्याने मारला हातावर चाकू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ ।  पोलिस दारु पिण्यासाठी पैसे देत नाहीत म्हणून एका तरुणाने पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर स्वत:चा हात चाकुने कापून घेतल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्यात घडली. इतकेच नाही तर यापुढे जात त्याने पोलिसांनाच गुन्ह्यात अडकवण्याची धमक्या दिली.

सागर महारु सपकाळे (वय ३१, रा. प्रजापतनगर) असे या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. तो नेहमीच पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांकडे किंवा रस्त्यावरील नागरीकांकडे दारु पिण्यासाठी पैसे मागत असतो. पैसे दिले नाही तर पोलिसांना खोट्या गुन्ह्यात अडकवुन नोकरी घालवण्याची धमकी देत असतो. अश्याच प्रकारे काल बुधावरी देखील रात्री तो पोलिस ठाण्यात आला. ‘मला दारु पिण्यासाठी पैसे द्या, नाहीतर मी हाता-पायास चाकु मारुन तुमचे नाव कोर्टात व वरीष्ठ अधिकाऱ्यांना सांगेल’ अशी धमकी त्याने दिली.

यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित असलेले कर्मचारी त्याची समजुत काढत असताना सागरने हातातील चाकुने उजव्या हाताच्या पंजावर स्वत:ला जखमी करुन घेतले. ‘तुम्ही मला नियमित पैसे देत जा, नाहीतर मी माझ्या मानेवर चाकु मारुन पोलिस ठाण्यात जीव देईल, माझ्या बायको मुलांना सांगेल पोलिसांनी मला मारले आहे, असे कोर्टात सांगा’ अशी धमकी देत त्याने पुन्हा एकदा चाकु मारुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अडवून ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी योगेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सागरच्या विरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज