आजपासून विवाह मुहूर्त सुरू, ‘या’ दोन महिन्यात सर्वाधिक मुहूर्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । तुळशी विवाह झाल्यानंतर लगीन घाईचे दिवस सुरू होतात. यंदा आज २० नोव्हेंबरपासून विवाहसाठी मुहूर्त सुरू होणार आहे. हे मुहूर्त ९ जुलैपर्यंत चालणार आहे. म्हणजेच आठ महिन्यांच्या काळात ६३ लग्नतीथी आहेत. डिसेंबर व मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने हे दोन महिने लग्नाच्या धामधुमीचे ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० मुहूर्त अधिक आहेत.

दिवाळी सण झाल्यानंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट लग्न समारंभांवर पडले होते. त्यामुळे लग्नसराईत वाद्ये वाजवणारे ब्रास बँड पथक, ढोल-ताशा-वाजंत्री यांच्याबरोबर छायाचित्रकारसुद्धा आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने लग्न समारंभ धामधुमीने होणार आहे.

यंदा कर्तव्य आहे अशा वधू-वरांसाठी वर्षभरात ६३ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत. यंदा २० नोव्हेंबरपासून मुहूर्त सुरू होणार असून ९ जुलैपर्यंत चालणार आहे. डिसेंबर व मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने हे दोन महिने लग्नाच्या धामधुमीचे ठरणार आहे. गतवर्षीपेक्षा मुहूर्त यंदा अधिक अाहेत. त्यामुळे मंगल कार्यालय मिळवणे अवघड ठरणार आहे. दरम्यान, यावर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये २०, २९, ३० तर डिसेंबरमध्ये १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९ असे मुहूर्त आहेत.

जानेवारी २०२२ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त
विवाहासाठी शुभ मुहूर्त २०, २२, २३, २७, २९, असे असेल.

फेब्रुवारी २०२२ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

५, ६, ७, १०, १७, १९ आणि २२ फेब्रुवारी २०२२ लग्नासाठी शुभ आहेत.

मार्च २०२२ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

मार्च २०२२ मध्ये लग्नासाठी फक्त ४ शुभ मुहूर्त आहेत. २५, २६, २७, २८, या तारखेला लग्नासाठी शुभ मुहूर्त आहे.

एप्रिल २०२२ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त
लग्नासाठी १५, १७, १९, २१, २४, २५ एप्रिल 2022 रोजी शुभ मुहूर्त आहे.

मे २०२२ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त
४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७, असे शुभ मुहूर्त आहे.

जून २०२२ लग्नासाठी शुभ मुहूर्त

१, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२ असे शुभ मुहूर्त आहे.

जुलै महिन्यात ३, ५, ६, ७, ८, ९ अशा तारखा असून यंदा ६३ शुभ मुहूर्त लग्नासाठी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० मुहूर्त अधिक आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज