निवृत्त जवानाचा ग्रामस्थांनी केला गौरव‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । भारतीय सैन्य दलामधून निवृत्त झालेल्या जवानाची ग्रामस्थांकडून सन्मान करण्यात आला.

सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील करमाड बुद्रुक गावाचे रहिवासी‎ गोविंदा राजाराम पाटील हे भारतीय सैन्य दलामधून निवृत्त‎ झाले असून यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या निवृत्तीबद्दल‎ सन्मान करण्यात आला.

सरपंच, उपसरपंच,‎ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, सुकदेव पाटील,‎ मोतीलाल पाटील, रावसाहेब पाटील, कोमल पाटील, जवान‎ मुकेश पाटील, जवान गरुड, जवान नितिन पाटील आदी‎ मान्यवर उपस्थित होते. यावेळी जवान गरुड यांनी देश सेवेचा‎ आनंद वेगळा असल्याचे सांगून तरुणांनी सैन्य दलातील‎ भरतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सुशील पाटील‎ यांनी आभार मानले.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -