fbpx

बळीराजाची सुलतानी संकटातून मुक्तता व्हावी : जयश्री महाजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । पोळ्यानिमित्त आज दि.6 सप्टेंबर रोजी सकाळी जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन यांनी आपल्या मेहरूणमधील निवासस्थानी अंगणात सडा, रांगोळीसह फुलमाळांची सजावट करून शेतकर्‍यांचे दैवत मानल्या जाणार्‍या बैलांची ढोल-ताशांच्या गजरात बैलपूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी महापौरांनी सांगितले, की हिंदू धर्मातील वर्षभरात येणार्‍या सणांपैकी आमच्या महाजन परिवारातील पणजोबा, आजोबा अन् आता सासू-सासर्‍यांसह आम्ही पोळा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानून साजरा करीत असतो. महापौर झाल्यानंतर हा माझ्यासाठी पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे संपूर्ण परिवारासह परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. अलीकडे अवकाळी पावसासह विविध सुलतानी संकटांमुळे शेतकर्‍याची हतबलता कमी व्हावी, त्याने अन्न-धान्य पिकवून सर्वत्र सुजलाम् सुफलाम् व्हावे तसेच कोरोनारूपी संकटातूनही आम्हा सर्वांची कायमची मुक्तता व्हावी यासाठी परमेश्वराला मी नतमस्तक होऊन प्रार्थना करते व समस्त शेतकरी बांधव तसेच जळगावकरांना पोळ्याच्या शुभेच्छा देते. याप्रसंगी आप्तेष्ट, परिसरातील रहिवाश्यांसह महाजन परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt