⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | किरकोळवादातून दोन गट भिडले, परस्परविरोधी तक्रार; धरणगावमधील घटना

किरकोळवादातून दोन गट भिडले, परस्परविरोधी तक्रार; धरणगावमधील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । धरणगाव शहरातील एका भागात किरकोळ वादातून, दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २० व २२ रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी १२ जणांविरुद्ध विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिली.

छायाबाई गणेश भिल (वय ४२, रा. संजयनगर, जुनी पोलिस लाईन जवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २० मे रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास गल्लीतील रेखाबाई दिलीप महाजन ही महिला जात असताना ती शिवीगाळ करत होती. यावेळी छायाबाई आणि त्यांची आई जनाबाई यांनी कुणाला शिवीगाळ करताय असे विचारले. तेव्हा रेखाबाई यांनी मी दुसऱ्या बाईला शिवागाळ करते आहे, असे सांगितल्याने वाद वाढला. यानंतर रेखाबाई यांची दोन्ही मुले आकाश दिलीप महाजन, सागर दिलीप महाजन यांना शिवीगाळ केली. छायाबाई यांचा भाऊ मानसिंग याने जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच पाठीवर चाकूने वार केले. याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

दुसऱ्या फिर्यादीत मंगलाबाई (नाव बदलेले) यांच्या घराची भिंत पाडण्यावरून २२ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गल्लीतील एका महिलेसोबत सोबत वाद झाला. जनाबाई अरुण भिल, मंगलबाई दीपक भिल, छायाबाई गणेश भिल यांनी मंगलाबाई यांना शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच गळ्यातील मंगळसूत्र व एक पोत तोडली. घरभरणीचे आलेले ८ हजार रुपये देखील काढून घेतले. तर मानसिंग अरुण भिल, गणेश भिल, रोहीत दीपक भिल, विकी दीपक भिल, श्रावण भिल, तुषार भिल यांनी घरात घुसून सामान फेकाफेक केली आणि खिडकीच्या काचा फोडल्या. तर अल्पवयीन मुलीला मारहाण करून विनयभंग केला. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह