जळगावमध्ये गवळी समाजाची ‘सगर उत्सवा’ची परंपरा कायम

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । संगणक आणि इंटरनेटच्या युगातही वीरशैव लिंगायत गवळी समाजात दिवाळी पाडवा व बलीप्रतिपदेला सगर पूजनाची (रेडा, म्हशी पूजन) परंपरा कायम सुरू आहे.

महाभारत काळात भगवान श्री कृष्णानी गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते. तेव्हापासुन सगर पूजनाची सुरवात झाली आहे, असे जुने जाणकार सांगतात. पारंपरिक दुग्ध व्यवसायानिमित्त गवळी समाज बांधव दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा निमित्त सगर उत्सव साजरा करतात.आगामी काळात व येणाऱ्या नववर्षात राज्यासह देशात व समाजात अघटित संकट येऊ नये म्हणून गाई-म्हशी लक्ष्मीचे स्वरूप आणि यम राजाचे वाहन रेड्याची दिवाळी पाडव्यानिमित्त सगर पूजन केले जाते. वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेड्याच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठीही परंपरा आजही जोपासत आहे. दिवाळी पाडव्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी गवळी समाज बांधव एकत्र जमतात. या उत्सवाचे महत्त्व म्हणजे सगर अर्थात रेड्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते.

जळगाव शहरात मोहाडी रोड परिसर तसेच शिरसोली गवळी वाडा परिसरात वीरशैव लिंगायत गवळी समाज दैव पंच मंडळ व समाज बांधवांकडून हा सण साजरा करण्यात आला. यावेळी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुद्देशीय संस्थेचे जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक जोमीवाळे, युवा प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा गठरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे, सचिव नारायणराव बारसे, सहसचिव अशोक जोमीवाळे, शंकर काटकर, विशाल बारसे, जेष्ठ पंच भागवत बारसे, साहेबराव बारसे आदी समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज