चोरट्यांनी चोरलेल्या तीन दुचाकी मूळ मालकांना मिळाल्या परत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । शहरातील विविध भागातून चोरीस गेलेल्या दुचाकी पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहेत. नरेश पांडुरंग पवार ( वय ४६ ), इब्राहिम तुसा तांबोळी व सुनील एकनाथ काळे असे संशयित चोरट्यांचे नाव आहे. अशा तीन दुचाकी न्यायालयाच्या आदेशाने ५ रोजी जिल्हापेठ पोलिसांनी मूळ मालकांना परत केल्या.

संतोष शिवलाल लोंढे यांची २५ हजार रुपयांची दुचाकी (एमएच १९ डीबी ७२२७) इच्छादेवी चौकातून चोरीस गेली होती. ही दुचाकी नरेश पांडुरंग पवार (वय ४६, रा. रामेश्वर कॉलनी) या चोरट्याकडून हस्तगत केली. भरत राजू गवळी यांची १५ हजार रुपयांची दुचाकी (एमएच १९ सीएस ३९५४) ही बेवारस स्थितीत रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळून आली. तर नरेंद्रकुमार भीमराव बोरसे यांची १२ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १९ एवाय ८३३८) ही इब्राहिम तुसा तांबोळी व सुनील एकनाथ काळे (दोघे रा. तोंडापूर, ता. जामनेर) या चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आली. या तीनही दुचाकी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, भारत चव्हाण, गणेश पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आल्या.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar