कोरोनाच्या विपरीत परिस्थतीत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद : प्र. कुलगुरू डॉ. पवार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । कोरोना महामारीच्या काळात महाविद्यालय बंद, ऑनलाईन शिक्षण व नवीन मूल्यमापन पद्धती या विपरीत परिस्थितीत विध्यार्थ्यानी मिळवलेले यश हे खरोखर कौतुकास्पद व मनोबल वाढविणारे आहे तसेच विद्यार्थ्यानी आपल्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातील विविध उपक्रमात व स्पर्धामध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार यांनी केले.

रायसोनी बिझनेस मेनेजमेंट महाविद्यालयात गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष अविनाश रायसोनी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र.कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार, संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल, व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा.डॉ. मकरंद वाठ, संगणक विभाग प्रमुख प्रा. रफिक शेख, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राजकुमार कांकरिया आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल प्रास्ताविकेत बोलतांना म्हणाल्या की, रायसोनी इन्स्टिट्यूट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते, महाविद्यालयामधील सहकारी प्राध्यापक स्वतः अभ्यासू असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत व महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घालीत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी महाविद्यालयातील बीसीए, आयएमसीए, डीएमसिए, बीबीए, एमबीए, एमएमएस शाखेतील महाविद्यालयाने घेतलेल्या २०२१ च्या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त केलेल्या तसेच “कश्ती” या वार्षिक स्नेहसमेलनात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ, गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी यांनी केले तर आभार प्रा. ज्योती जाखेटे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद, पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना मिळाले पारितोषिक
बीबीए प्रथम वर्ष शाखेत कांचन माळीने प्रथम, हेमा हारवनीने द्वितीय, क्रिष्णा वर्माने तृतीय, बीबीए द्वितीय वर्ष शाखेत खुशी रावलानीने प्रथम, श्रुष्टी रामचंदानीने द्वितीय, कोमल चव्हाणने तृतीय, बीबीए तृतीय वर्ष शाखेत मुस्कान मंधानने प्रथम, साहिल कौराणीने द्वितीय, केतन पवारने तृतीय, एमबीए द्वितीय वर्ष शाखेत प्रिया जैनने प्रथम, कपिल परदेशीने द्वितीय, हर्षिता वर्माने तृतीय, एमएमएस द्वितीय वर्ष शाखेत आशिष कुकरेजाने प्रथम, धनंजय पाटीलने द्वितीय, अश्विनी सूर्यवंशीने तृतीय, बीसीए प्रथम वर्ष शाखेत अहमद खान अफझल खानने प्रथम, विजया महाजनने द्वितीय, मोहिनी चिंचोरेने तृतीय, बीसीए द्वितीय वर्ष शाखेत दिप्ती जाधवने प्रथम, रेवती निकुंभने द्वितीय, अश्विनी दहातोंडेने तृतीय, बीसीए तृतीय वर्ष शाखेत लिसा मांधवाणीने प्रथम, मुस्कान नाथानीने द्वितीय, आदित्य ओस्तवालने तृतीय, आयएमसीए चतुर्थ वर्ष शाखेत सागर पाटीलने प्रथम, निकिता रायपुरेने द्वितीय, खान सुमैया कौसर नसीर अशरफने तृतीय, आयएमसीए पाचवे वर्ष शाखेत साक्षी अग्रवालने प्रथम, मोहित केशवने द्वितीय, वाशीख शेखने तृतीय तर एमबीए शाखेतील ‘स्टुडट ऑफ द ईयर’ हा पुरस्कार प्राची जगवानी, प्रिन्स महाजन, आयएमसीए शाखेत पूनम पाटील, मोहित खुशवा, बीबीए शाखेत राधा पाटील, केतन पाटील, बीसीए शाखेत मुस्कान नाथांनी व प्रतिक अहिरे यांना मिळाला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -