जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । चोपडा तालुक्यातील वर्डी येथील स्वातंत्र्य सैनिक शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी अलशिफा रऊफ पिंजारी हिने रस्त्यावर सापडलेले तीन हजार रुपये प्रामाणिकपणे परत केले.
ही रक्कम विद्यार्थिनीने गावातील लिलाधर चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांना परत केली. रक्कम सापडल्यानंतर विद्यार्थिनीने त्याची माहिती वडीलांना दिली. तिच्या वडीलांनी गावात रक्कम हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. तसेच त्यांना रक्कम परत दिली. त्याबद्दल अलशिफाचा रऊफ पिंजारीचा सत्कार करण्यात आला.
हे देखील वाचा :
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- LIVE : मतमोजणी सुरू : विधानसभा २०२४ निकाल